नांदी
नाही. नांदी ह्या नाटकाची सुरुवात नांदी नी होत नाही. Actually त्याचा शेवट 'पंचतुंड नररुंड' ह्या सुंदर नांदी नी होतो. नुकताच ह्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात झाला (दुसरीकडे कुठे होणार?!). त्या विषयी थोडसं.
नाटकाच्या सुरुवातीला एक पात्र असं म्हणुन जातं की आपल्याला आपला इतिहास समजून घेण्यात रस नसतो, मग भविष्यात काय करायचं ते कळत नाही आणि वर्तमानात नुसते गोल गोल फिरत बसतो. इंग्रजी मध्ये पण अशी म्हण आहे कि 'Those who cannot learn from history are doomed to repeat it'. माझा इतिहास हा विषय कायमच कच्चा होता. कदाचित ह्या नाटकात जितक्या प्रामाणिकतेने आणि रोचकतेने नाटकाचा इतिहास दाखवला आहे तसाच आमच्या शाळेतल्या मास्तरांनी शिकवलं असतं तर interest develop झाला हि असता. असो. जरी आपण इतिहास घडवणारे किव्हा तो पुढे मागे करणाऱ्यांपैकी नसलो तरी तो जाणून घेतल्यानी आपल्या सोबत आजूबाजूला बसलेल्या व असलेल्या लोकांविषयी काही interesting फंडे कळू शकतात कधी कधी. आणि तो इतिहास सांगायला स्वतः भरत मुनी आले तर? Add some sense of humor to the guy and you have a fun filled journey into the history of Marathi Theater.
कालिदासलिखित अभिज्ञान शाकुन्तलम् मधील एका प्रसंगाने ह्या प्रवासाला सुरवात होते. मी असा प्रकार पहिल्यांदाच बघत होतो म्हणुन जरा मजेशीरच वाटत होतं. अति आदर अथित्य. 'हे आर्यपुत्र' type dialogues. अतिरंजित हावभाव. आपण ह्या सगळ्याचं विडंबनच पाहिलेलं असतं. खरं कोण करतं असं आजकाल? पण ह्यातील कलाकारांनी ते खूपच sincerely केलं. म्हणुनच कदाचित प्रेक्षकांनी पण प्रवेश संपल्यावर टाळ्यांनी त्यांचं कौतुक केलं (व्यावसाईक नाटकाचे प्रेक्षक हे प्रायोगिक नाटकांना उगवणाऱ्या प्रेक्षकांपेक्षा कमी 'serious' असतात असं दिसतं. व्यावसाईक नाटकं वेळेवर सुरु होत नाहीत, लोकं मधे मधे येत रहातात, mobile वाजतात, 'आवाज आवाज' असं ओरडतात. पण हाच प्रेक्षक जास्त उत्स्फूर्त आणि न लाजता दाद देतो असेही जाणवते). ह्या नंतर संगीत सौभद्र मधील 'आजच्या youth ला आवडेल असा romantic' प्रवेश झाला. प्रसाद ओक ह्यांचा स्त्रीभूमिकेतील अभिनय आणि अजय पुरकर ह्याचं गायन फारच वरचढ झालं. जोरदार once more मिळाला आणि तो त्यांनी घेतला सुद्धा. कीचकवध, सखाराम बाईंडर, एकच प्याला, नटसम्राट, अश्रूंची झाली फुले, Barrister अश्या अनेक उत्तमोत्तम नाटकांमधील प्रवेश झाले.
ह्या सगळ्याला एकत्र गुंफ़णारे दोन धागे होते. एक म्हणजे कालिदासाच्या काळापासून आत्तापरेंत बदलत आलेले स्त्री पुरुष नातेसंबंध. कस अजूनही सगळा focus हा पुरुष पत्राचे काय होते ह्याला दिला जातो. फक्त नाटककार नाही तर प्रेक्षकांकडून सुद्धा. आणि दुसरा धागा म्हणजे पूर्वीच्या काळी असलेलं जाती, वर्ण, शारीरिक संबंध ह्या विषयी नाटकांमधून बोलण्याचं स्वातंत्र्य आता का कमी होत जातंय हा होता. ह्या नाटकातील भरत मुनी म्हणतात तस - ह्या गोष्टी प्रत्यक्ष होतात तेव्हा त्याचं कोणाला काही वाटत नाही पण त्याच नाटकात दाखवल्या तर बोंबाबोंब, दगडफेक, हाणामारी !
फालतुचे ban आणणं आपण बंद करावं आणि ** मधे दम असल्यासारखं वागावं ह्या सदिच्छेवर हे नाटक संपतं. मला तरी खूप आवडलं. तुमचं तुम्ही ठरवा. नाट्यं भिन्नरूचैर्जनस्य !!
Labels: नाटक review
2 Comments:
Saw Saubhadra. Not the Ajay Purkar one- but the Aanand Bhate one.
Enjoyable experience - except that the 'male' Subadra was taller and heftier than the artist playing Arjun. It was hilarious as an experience.
hmm.. that must be really funny ;-)
Why did they have male playing female role now?
Post a Comment
<< Home