Saturday, August 12, 2006

सोमा ने 'न' लावलेल पान

NOTE 1: please forgive my marathi. i know its horrible
NOTE 2: i am saying this with great relectance, but please use IE for this.

पुण्याच्य 'सारस बाग' ह्या भागात कधी गेला असाल तर तो भाग किती जिवंत अहे ते तुम्हाला जाणवल असेलच. पण किती लोकांना माहित अहे कि जिवंत माणसांना होतो तसा पुण्याच्य ह्या भागाल 'schizophrenia' or 'split personality' नावाचा रोग फार पुर्वी पासुन आहे. तुम्ही जरका इथे दिवसा अला असाल तर तुम्हाला असंख्य 'family' category मधली लोक, तळ्यतल्या गणपतीला किंव्हा मग पोरांच्या giant wheel, horse ride (थोडक्यत 'जिवाची जत्रा') साठी आलेले दिसतील.
पण रात्री इथे वेगळ्च चित्र दिसत. त्या चित्राच्या तप्शिलात मी शिरत नाही पण माझ्या सारख्या 'निशाचर' category मधल्या लोकांना ते आपापल्या मनात रंगवता येईल. रात्री १-२ ला party संपली की जेवणाची सोय कुठे करायची? ह्या प्रशणाला काही ठराविक उत्तरं आहेत. (ज्यंना "मग party मधे काय केलत?" असा प्रश्ण पडला असेल, त्यांना देव माफ करेल.) lucky चा mutton khima, station किंव्हा shivajinagar ची अंडा भुरजी, गिरिजा किंव्हा सारस बाग ची पावभाजी आणि milk shake (काही लोकांसाठी party नंतर 'दुग्धजन्य' पदार्थांना एक वेगळच महत्व आहे)
असो..तर अश्या ह्या सारस बागेच्या एका कोपर्यात 'सोमा शेठ' ह्यांची पानाची टपरी आहे. 'रामप्रसाद पावभाजी' शेजारी. तिथे अजुन पण एक-दोन टपर्या आहेत. पण सोमाच पान सर्वात popular. आम्ही पण कायम त्याच्या कडेच जायचो. तोंडात कायम तोबरा भरलेला आणि समोर १५-२० पानं मांडलेली. पुलंच्या भाषेत तो 'अस्स्ल पानवाला' मुळीच नाहिये. rather तो पान बनवन्याची assembly line असावा. पण मी पण 'अस्स्ल' पान खाणारा नसल्यामुळे, आपल्याला काय फरक पडतो??
तर असच एकदा मी आणि माझा एक मित्र सोमाच्या टपरी वर गेलो. मी माझ नेहेमीच 'बनारस मसाला' सांगितल आणि रव्यानी त्याच ते 'फुलचंद १२०/३००, रिमझिम कम, चुना ज्यादा' वगेरे-वगेरे सांगितल. नुकताच पाउस पडुन गेला होता, रस्ते अजुन ओले होते. basically एक नंबर वातावरण होत. मी म्हंटल आज काहितरी वेगळ try करुय (हे वाक्य जरी innocent वाटत आसल तरी त्यच्या सहजपणा वर जाउ नका. जाणकारांना हे माहित असेलच कि life मधल्या अनेक imp गोष्टी अश्याच सुरु होतात - चांगल्या आणि वाईट).
मी: सोमा शेठ. आपल्याला पण तंबाकु पान घ्या आज. रव्या ते details सांग कायते.
ह्यावर सोमाने नुस्त थोड मान हालवल्या सारख केल. त्याचा अर्थ 'busy आहे, वेळ लागेल' असा लावला, आणि गप्पा मारत उभा राहिलो.पण मित्राच पान येउन ५ मिनिट झाल्यावर मला लक्षात अल कि हा बहुतेक विसर्ला.
मी: शेठ. आपल्याला एक first class तंबाकु पान लावा.
सोमा: नाही लावणार.
मला obviously काही झेपलच नाही. माझी उधारी फार झाली का, असा मी विचार करत होतो.
सोमा: शिकल्या-सवर्लेल्या लोकांना रस्त्यावर आणलेल पाहिल आहे मी. भिका मागितल्या आहेत ह्या तंबाकु पाई.
मी आणि रव्या एकमेकांन कडे बघुन हासायला लागलो. काय येडा झाला का सोमा!!
मी: अहो शेठ. पण मला खायचय्. लावा तुम्ही.
सोमा: नाही साहेब. बाकी काहिही मागा. तंबाकु लय वाईट.
बराच वेळ हुज्जत घालुन पण तो ऐकेच ना. शेवटी मलाच कंटाळा आला. मसाला पान तोंडात भरुन तसाच घरी गेलो.

ह्याला अता बरिच वर्ष झाली आहेत. पण अजुनही हे आठवल कि मजा वाटते. रोज शेकडो तंबाकु पान विकणार्याला अचानक त्या रात्री काय झाल? एकदम त्याचा गांधी बाबा का झाला?
i guess आपल्या मधल्या प्रत्येकाला कुथेतरी चांगल बनायची उपजत ईच्छा असवी. पण शिक्षण/पैसा ह्याला जसं formal recognition आहे तसं चांगुलपणाला नाही. म्हणुन somehow ते 'optional' बनत जातं. जितक कौतुक आपण performance/prize च करतो तितक ह्याच करतो का?how many of us would dare to do good and come second? or be called unprofessional for that. Unprofessional seems to be the worst remark u can get these days.
his act was obviously unprofessional...even stupid. आयुष्यभराच एक गिराहिक त्यानी स्वताहून घालवल. but do u think he was a fool for doing this?

विषयांतर झालच आहे तर अजुन थोड करतो. 'चांगल माणुस' म्हंटल कि मला माझे अजोबा आठवतात. त्यांनी काही अचाट पैसा कमावला नाही. थरवल अस्त तर कमवू शकले अस्ते. (he was real real smart) पण असंख्य लोकांकडुन त्यांच्या बद्द्ल एकच वाक्य ऐकलय "विसुभाउ म्हणजे देवमाणुस". त्यांच हसण मला अज़ुन आठवत. मला लहान मुलांच्या निरागस हासण्याच कौतुक वाटत नाही. त्यांना मुळात काही समजतच नस्तं.पण ज्या माणसानी आयुष्यातिल सगळी सुख-दुख्खा पाहिली, त्याच्या हसण्यात कण भर सुद्धा कटुता नसावी?आजच्या standards नी त्यांना कदाचित successful म्हणता येणार नाही, पण मला त्या हसण्याचा हेवा वाटतो, आणि आजुबाजुचा compitition/acheivement oriented जग पाहुन एकच वाक्य डोक्यात येत....

ते पुर्वीच पुण अता नाही राहिल!

Labels:

8 Comments:

Anonymous Anonymous said...

Stopped by your page while surfing..nice write up about paanwaala. keep writing regularly.

Eve

6:58 AM, August 14, 2006  
Blogger Unknown said...

एक नंबर. तुला भेटतो तेंव्हा तुज्हयातला हा सिध्दार्थ भेटत नाही.
- तुषार इनामदार.

2:02 PM, August 19, 2006  
Blogger Amruta said...

best ahe siddhya...

6:00 PM, August 24, 2006  
Blogger सर्किट said...

very well written.. with a nice thought! keep blogging :)

1:49 AM, November 05, 2006  
Anonymous Anonymous said...

khup sahi lihile ahes ...ani dont worry tuze marathi sahi ahe .....manaje mala tari kalle ...
ani tuzyakade lihinyachi kala ahe mala vachtana ekdam dolya samor chitra uabhe rahile ....
really good one :)

1:30 AM, December 09, 2006  
Anonymous Anonymous said...

siddhya sahi aahet re ...soma kada jayala pahije ekda...keep writing

9:46 AM, January 19, 2007  
Blogger Moreshwar Apte said...

siddhya ha kamaal hota...
kip it up....
"split personality...."upama faar awadali...

1:38 PM, March 16, 2009  
Blogger Moreshwar Apte said...

siddhya jamala re....

7:34 PM, August 11, 2009  

Post a Comment

<< Home