राही
ह्या मुलीला कसलीच घाई नव्हती. शाळेत जायची नाही. डबा खायची नाही. नोकरी शोधायची नाही. लग्न करायची नाही. ह्या धावपळीच्या जगात अश्या मुलीनी काय करावं? राहीनी शाळा केली कॉलेज केलं संसार केला. बटाट्याची भजी उत्तम केली. राहीनी बरंच काही केलं नाही. ती कधी चंद्रावर चालली नाही. चित्र काढली नाहीत. सिग्नल मोडले नाहीत (कारण तिला कसलीच घाई नव्हती !). झाडावर चढून चिंचा पाडल्या नाहीत. जे काही केलं ते सहज केल. जे काही करायचं राहिलं ते सहज राहिलं. इतक्या सगळ्या गोष्टी केल्या नाहीत तरी तिला कोणी आळशी म्हणल्याच आठवत नाही.
आई: अग पटकन अवर. शाळेला उशीर होईल !
बाबा: काही उपयोग नाही. ती तिच्याच वेगाने धावते.
राही कायम वेळेवर शाळेत पोचायची. ऑफिस मधे जायची तेव्हा वेळेवर जायची. पण 'सब चीज time to time होनी चाहिये' अशी पण नव्हती. तिला गजरानी कधीच जाग यायची नाही. गजर हा प्रकारच तिला आवडायचा नाही. झोप संपली की उठायला तिला आवडायचं. राही खूप जोरात पळायची. आणि गाडी तितकीच हाळू चालवायची. Solid athlete होती. पाऊसात पळायला तिला विशेष आवडायचं. का कोणास ठाऊक? एका लयीत पळायची. तासंतास. गणित ह्या विषयात तिला काहीच रस नव्हता. तरी CA झाली. काहीतरी व्हायचं तर हे होऊ असा विचार केला असेल कदाचित. तिच्या संपूर्ण व्यक्तिरेखेत जर कश्याचा पुर्ण अभाव असेल तर तो महात्वाकांषेचा होता. पण हेच राहीच्या सर्वात जवळच्या मैत्रिणी विषयी म्हणता येणार नाही. तिला fighter pilot बनायचं होतं. वेगाची नशा होती म्हणे तिला. महात्वाकांषेची तिच्यात काहीच कमतरता नव्हती. Air force मध्ये जाणं जमलं नाही पण बाईक मात्र पिसाटासारखी चालवायची. राही कधीच तिच्या मागे बसायची नाही. आणि ती कधी राहीच्या गाडीत बसायची नाही. कारण इतक्या हाळू चालणाऱ्या गाडीत ती वैतागून जायची. म्हणुन एकाच ठिकाणाहून निघून एकाच ठिकाणी जायचं असेल तरी दोघी दोन वाहनांवर जायच्या. आपापल्या वेगानं. मला हे कायम कुतूहल वाटायचं की इतक्या भिन्न स्वभाव आणि आवडीनिवडीच्या दोन व्यक्ती भेटल्यावर काय बोलत असतील? पण त्यांच्यात संवाद होत असावा. कारण राहीचे आई वडील गेल्या नंतर तिला खऱ्या अर्थानं ओळखणारं अस ही मैत्रीण सोडून दुसरं कोणीच उरलं नव्हतं.
राहीचं तिच्या नवऱ्याशी कधीच पटलं नाही. पण तरीही तिनी संसार केला. गणितात रस नसतानाही CA केलं तसंच बहुतेक. तो पण CA. बोलायला विषय बरेच असावेत. पण काम सोडून त्यांच्यात काहीच बोलणं होयचं नाही. सुरवातीच्या काही वर्षात तिनी खूप प्रयत्न केला. त्यांनी ही केला असेल. पण नंतर तिला लक्ष्यात आलं. त्यांना एकमेकांची फक्त सवय होऊ शकते. साथ नाही. तो मितभाषी. तरीही दुसर्यांनी त्याच्या मनातलं ओळखून त्याच्याशी वागण्याची अपेक्षा ठेवणारा. त्याची चूक नसेल कदाचित. लहानपणा पासून हव्या त्या गोष्टी न विचारता मिळाल्यामुळे सवय लागली असेल. आणि इतर सगळ्यांनी आपल्याला हवं तसं वागायला कोणाला नको असतं? तो चारचौघानसारखा होता. ही वेगळी होती. दोष कोणाला देणार? आपण स्वताला खूप महत्वाचे समजतो. कुठेतरी बाकी लोकांनी पण आपल्याला महत्व द्यावं असं वाटत असतं. As he says "Most people don't understand that God cast them as extras in this movie". पण आपल्याला हिरो हिरोईन इतकं महत्व हावं असतं. आणि इतर लोकांपेक्षा ते आपल्याच बायको आई वडील मुलांकडून उकळणं सोपं असतं. पण राहीला हे काहीच समजायचं नाही. तिनी कधी उगिच महत्व मागितलं नाही. आणि ते द्यायला ही तिला कधी जमलं नाही. ज्या ज्या लोकांनी तिच्याकडून अश्या अपेक्षा ठेवल्या त्या त्या लोकांशी तिचे संबंध सहजच कमी होत गेले. दुर्दैवानी तिचं लग्न देखील ह्याच गटात मोडतं.

खरं तर ती फक्त तिच्यासारख्या व्यक्ती बरोबरच संसार करू शकली असती. पण तिच्यासारखी लोकं असतात कुठे ह्या जगात ?
Labels: fiction
4 Comments:
व्यक्ती चित्रण आवडल…लौकर आटोपलस रे …राही विषयी अजून वाचायला आवडेल …
Ninad
Thank you. I am glad you liked reading it :)
Hmm...this one is a bit short n not all points are convincing...;)
Yes it is short. I wish I could have written more.
What do you mean by all points are not convincing?
Post a Comment
<< Home