Rebel
दिग्दर्शकांनी ज्या प्रकारे चौकटीतील अवकाशाचा वापर केला आहे त्या मुळे जी निगेटिव स्पेस निर्माण होते ती आपल्याला बरच काही सांगायचा प्रयत्न करतीये. जी लोकं चार चौघात न घाबरता अशी वाक्य बोलू शकतात त्यांचा मला आदर वाटतो. अर्भात शोर्ट फिल्म क्लब च्या मागील भागाची थीम 'Spaces' अशी होती. मी जरा बिचकूनच होतो. अपेक्षे प्रमाणे मला ओ चा ठो काही कळलं नाही. अनेक अगम्य शोर्ट फिल्म एका मागून एक झाल्या. कधी झोप लागली कळलं नाही. जाग आली तेव्हा कोणीतरी भरगोस पांढरी दाढी असलेले इसम वरील प्रमाणे अव्हगड वाक्य बोलत होते (काही लोकं त्यांना समर नखाते सर अस म्हणत होते. असतील.) त्या नंतर 'Local' नावाची फिल्म दाखवली. ती मात्र मला कळण्यासारखी होती. फारच सहज सोपी आणि छान बनवली होती. फिल्म नंतर त्याचे दिग्दर्शक भरत पवार ह्याच्याशी संवाद झाला. कुठल्या तरी मजेशीर प्रेक्षकानी त्यांना विचारलं की तुम्ही असा बोल्ड विषय हाताळायचं का ठरवलंत? त्यावर नखाते सर म्हणाले सेक्स मध्ये काय बोल्ड आहे? तो माणूस गप्प बसला. त्या नंतर उस्ताद आमीर खांच्या वरची फिल्म्स डिविजन नी बनवलेली एक फिल्म लावली. ती तर फारच कमाल होती. त्यांचं जबरदस्त गाणं तर ऐकायला मिळालंच आणि खऱ्या आयुष्यात ते काय चीज होते हे पण कळलं. आपली आर्थिक परिस्थिती आपल्या मान सम्मान आणि नावाच्या बरोबरीची नसणं ही गोष्ट काही लोकांना लज्जास्पत किव्हा मानहानीकारक वाटू शकते. पण ते अश्या विचारांमध्ये अडकलेले दिसत नाहीत. उलट कलेचं वरदान मिळाल्या मुळे स्वताला खूप भाग्यवान समजतात. कमाल.
ह्या वेळेच्या शोर्ट फिल्म्स ची थीम 'Rebel' अशी होती. म्हणून मला स्वतःकडून ते समजण्याच्या जरा जास्ती अपेक्षा होत्या. मला पोचायला पाच मिनिटं उशीर झाला आणि पहिली फिल्म आठ मिनिटांची होती. हि हि. पण शेवटची तीन मिनिटं पण solid होती. एका शाळेत मुलांना २ + २ = ५ असं शिकवत असतात. एका मुलाला हे पटत नसतं म्हणुन तो प्रश्ण विचारतो. उत्तर तर मिळत नाहीच पण धमक्या आणि मारहाणीन त्याच्या डोक्यात हे चुकीचे विचार ठोकले जातात. इतर मुलांनी तर कधीच भीती मुळे हे समीकरण मान्य केलं असतं. हुकुमशाही आणि totalitarianism (माझच खरं) मुळे लोकांची मनं कशी मारली जाऊ शकतात हे त्यांना दाखवायचं होतं कदाचित. असो 'Two and Two' चा शेवट अगदीच वाईट केला नाही हे आपलं नशीब.
'आमुख' मध्ये आपल्या वृद्ध पित्याची काळजी घेणारी एक शिक्षिका दाखवली होती. वडील जातात आणि अंत्य विधींची वेळ येते. घर चालवणे वडील आणि लहान भावाची काळजी घेणे हे सर्व तिनी एकटिनी केलं असतं. पण तिला चितेच्या जवळ उभं पण रहायची परवानगी नसते. खोलीत कोंडून ठेवतात. ती बंड करते आणि भावाच्या बरोबरीनी चितेला अग्नी देते. शेवटच्या दृश्यात असं दिसतं की तिच्या वर्गातली सगळी मुलं निघून जाऊन एकच उरला आहे. पण ती त्याला तितक्याच उत्साहानी शिकवत आहे. असा आगाऊ पणा केला की त्याचा त्रास तुम्हाला होणारच. पण तरीही काही आगाऊ पणा शहाणपणाचे असावेत.
'विठ्ठल' हा प्रकार तर फारच अप्रतिम होता. विठ्ठलचे आजोबा जातात. त्याची अजिबात इच्छा नसताना त्याला बळजबरी पकडून त्याचं मुंडण करतात. त्याला माहित असतं की डोक्यावर केस नसल्या मुळे शाळेत त्याची खूप टिंगल होणारे. मोठ्या माणसांना त्याचं महत्व कळत नाही. केसच कापलेत ना? उगवतील परत दोन महिन्यात. त्या वयात मुलं काहीही सहन करू शकतात पण इतर मुलांकडून हेटाई होण्याला ते सर्वात घाबरतात. त्याला प्रचंड राग आलेला असतो आणि तो वेड्या वेड्या सारखं वागत असतो. अश्या प्रथांमध्ये मुलांना ओढून आणण्यात काही अर्थ असतो का? विषय गंभीर असला तरी सादरीकरण खूपच हलकं फुलकं ठेवलं होतं. दिग्दर्शक विनू चोलीपारंबीळ (मराठी नसून मराठी फिल्म बनवली !) ना कोणी तरी विचारलं की मुलं आणि प्राण्यांनकडून अभिनय करून घेणं सर्वात आवगड असतं असं म्हणतात. तुमचा काय अनुभव? ते म्हणले ती त्या छोट्या मुलाची भूमिका करणाऱ्या मुलाचा पहिल्या दिवशी पासून त्यांच्यावर इतका विश्वास होता की तो त्यांचं सगळं ऐकायचा. विश्वास असेल की बऱ्याच गोष्टी सोप्या होतात असं दिसतंय.
'पिस्तुल्या' नी तर सगळ्याचं मन जिंकलं. पारधी समाजामधला एक मुलगा ज्याला शाळेत जायची जबरदस्त इच्छा असते. पण इतर लोकं त्याला गचंडीला पकडून चोरी च 'training' देतात. शेवटच्या दृश्यात असं दाखवलंय की तो त्याच्या बहिणीसाठी शाळेचा गणवेश चोरतो. फिल्म संपल्यावर दिग्दर्शक नागराज मंजुळे ह्यांना पहिला प्रश्ण आला की हे त्यांच्या व्यक्तिगत अनुभवातून आलंय का? मला शॉकच बसला. पण नागराज ह्यांनी शांतपणे हो असं सांगितलं. त्यांच्या सगळ्या नातेवाहीकांमध्ये ते सर्वात जास्त शिकलेले. बाकी बहुतेक जण दुसरी तिसरी परेंतच. शिक्षणाची जबरदस्त इच्छा होती म्हणुनच शिकू शकले. माझ्या सारखं 'by default' graduate झाले नव्हते. त्यांचे ही फिल्म बनवतानाचे किस्से ऐकताना passion म्हणजे काय असू शकतं ह्याची जाणीव झाली. त्याची 'Fandry' नावाची नवीन फिल्म येत आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा !!
Labels: movie review
1 Comments:
http://www.hollywoodreporter.com/review/fandry-mumbai-review-649640
Post a Comment
<< Home