Monday, August 27, 2018

आरामात काम

मी: आपण फार load घेत नाही
ती: कश्याचं?
मी: कामाचं. लोकं उगीच खूप काम करतात. मला bore झालं कि आपलं काम बंद. कोणाच्या बापाची भीती नाय आपल्याला.
ती: तुला वाटतं लोकं भीतीनी काम करतात?
मी: of course
ती: खूप मोठं व्हायचय तुला अजून

Labels:

Wednesday, August 22, 2018

वेळेला केळ

मी: आज आपन खुश ए
तो: का
मी: कारण आज सगळं माझ्या मनासारखं झालं
तो: म्हणजे उद्या तू नक्की नाखूष असणार
मी: काळतोंड्या
तो: हा मूर्खपणा आपण रोज करतो पण कोणाच्याच लक्ष्यात कसा येत नाही?
मी: चल party करू

Labels:

Wednesday, August 15, 2018

आयुष्यात पुढे काय

मी: वेळ संपत चाललाय
तो: म
मी: काही Direction नाहीये आयुष्याला
तो: कश्याला हवीये?
मी: मोजायला. काय काय मिळवलं ते. शंभर छोट्या गोष्टींपेक्षा एक मोठी गोष्टं मिळवणं भारी.

Labels:

Monday, August 13, 2018

वासना

मी: मला शरीरसुख हावय.
ती: म मिळव.
मी: तसं नाही. स्वताचच शरीर सुखी हवाय.
ती: oh. म अवघड आहे.
मी: का?
ती: कारण ते तुझ्या हातात नाही.

Labels:

Sunday, August 12, 2018

काहीतरी नवीन

मी: बस यार काहीतरी नवीन करावसं वाटतंय
तो: नको करूस
मी: का?
तो: काहीतरी कधीच होत नाही
मी: म काय होतं?
तो: जे करतो तेच होत

Labels: