Monday, June 24, 2013

ध्रुव

टेबलावर फाइल्सचा गठ्ठा पडला होता पण ध्रुवला तो दिसत नव्हता. त्याच्या डोक्यात वेगळीच चक्र फिरत होती. फोनच्या आवाजानी तो परत माणसात आला. बॉस बोलवत होता. पटकन त्यांनी टेबलावरचे पाय काढून टेबलाखाली ठेवलेल्या बुटांमधे खोचले.  तडख चालत गेला आणि नेहमीसारखं धाडकन बॉसच्या केबिनचं दार उघडलं. बॉस फेसबुक चेक करत होता. घाबरून त्यांनी पटकन विंडो बंद केली. कश्याला घाबरला? तुम्ही असं म्हणू शकता की तो एकदम आलेल्या आवाजाला घाबरला. पण माझा असा अंदाज आहे की तो एकदम आलेल्या ध्रुवला जास्ती घाबरला. ध्रुवला जवळपास सगळीच लोकं थोडंफार घाबरायची. तसा वागायला बोलायला चांगला होता. दिसायलाही काही भीतीदायक नव्हता. पण का कोणास ठाऊक त्याच्याशी बोलताना लोकं बेसावद पकडली जायची. तो मुद्दामून असं काहीच करायचा नाही.

आई : काल जोशी काकूंना काय म्हणाला माहितीये का? तुम्ही कायम उशिरा का येता? काकांशी सारखं भांडत असता म्हणुन का? बिचाऱ्या गडबडून गेल्या एकदम. 
बाबा : पोच नाहीये कार्ट्याला.

पण ध्रुव फटकळ नव्हता. कारण लोकांना असं गार करण्यात त्याला काहीच आनंद नव्हता. उलट लोकांना तो आवडावा आणि त्याचं कौतुक करावं असाच कायम त्याचा प्रयत्न असायचा. पण नकळत घडणाऱ्या गोष्टी बदलणार तरी कश्या? चुणचुणीत किव्हा तुणतुणित असे शब्द त्याच्यासाठी अगदी योग्य आहेत. जन्माला येताना जी धक्का बुक्की करावी लागते ती काही लोकं कायमच चालू ठेवतात. त्याच्या जीवाला स्वस्थपणा माहित नव्हता. त्याला सगळच करायचं होतं. पण एक असं काहीच नाही. एखादी नवीन योजना मनात आली की वेड लागल्या सारखा त्याच्या मागे लागायचा. लहान मुलं कस नवीन खेळणं पाहिलं की जग विसरून त्याच्या मागे धावतात तसं. पण ती गोष्ट करायला लागला की त्या मधला रस कमी कमी होत जायचा. उसाचा रस जसा गटगट प्यायल्यावर संपत जातो तसा (हे त्याचे शब्द माझे नाहीत !) मग काही काळ खूप चिडचिडा व्हायचा. नवीन काहीतरी शोधायची धडपड सुरु करायचा. अश्या वेळेला त्याच्या बायकोला तो असह्य व्हायचा. आता मी काय करू? ह्याचा कंटाळा आलाय त्याच्यात काही मजा नाही अशी भुणभुण लावायचा. बरं त्याची बायको स्वयम सुखी. तिला ह्या गोष्टी कळायच्याच नाहीत. ती म्हणायची तुला हवं ते कर. मग त्याची अजून चिडचिड व्हायची. ती उदास आहे नवीन गोष्टी करायला आवडत नाहीत असं वाटायचं त्याला. आणि तिला कदाचित हे कळत नसावं की ह्याला सारखं काहीतरी नवीन का शोधावं लागतं. ध्रुव खूप विचार करायचा. रात्र रात्र जागायचा. त्याच्या बायकोला तिची झोप खूप लाडकी होती. कधी कधी मध्य रात्री तिला उठवून त्याला आत्ताच झालेली कविता ऐकवायचा. 

सवईचे गुलाम सगळे. श्वासांना इथे किंमत नाही. 
वर्षामागे वर्षे लपली. क्षणांची तर गणनाच नाही. 

थोडक्यात सांगायचं तर त्यांच्या लग्नाची वाट लागली होती. पण त्याला ती आवडायची. ती बरोबर असताना त्याची चुळबुळ थोडी कमी व्हायची. पण हे तो कधी बोलू शकला नाही. 

ऑफिस मधे मात्र तो काहीही बोलायचा. इतर लोकांना वाटते तशी नोकरी जाण्याची फालतू भीती त्याला कधीच वाटली नाही. खूप काम करायचा. स्वतःचं. इतरांचं देखील. पटपट बोलायचा. दुसरा हळुहळु बोलत असेल तर त्याला सारखा तोडून प्रश्ण विचारून पटकन माहिती उकळायचा. जबरदस्तीचं का होईना पण ऑफिस मधे एक ध्येय असतं. कदाचित म्हणुनच त्याला इथे नेहमी इतकं दिशाहीन वाटत नसावं. उत्साहाची तर त्याच्याकडे कधीच कमतरता नव्हती. ऑफिस मधल्या इतरांना तो खूप भारी वाटायचा. एखाद्या गोष्टीची गरज नसेल तर कसा बिनधास्त आणि निर्भीड वावर शक्य होतो तसाच त्याचा ऑफिस मधे असायचा. सगळे जेव्हा stock options, in hand, LTA वगेरे बोलत असायचे तेव्हा ध्रुव चेस मधल्या खेलींचा विचार करत असायचा. सर तुमचं चुकतय, असं सगळ्यान समोर बॉसला म्हणायचा. आणि बॉसही गप्पं बसायचा कारण बहुतेक वेळा ध्रुवचं बरोबर असायचं. असही नोकरीवरून काढण्यापेक्षा त्याला कंटाळा येउन तो नोकरी सोडण्याची शक्यता जास्ती होती. ध्रुव ला अंधाराची खूप भीती वाटायची. शॉवरमधे साबण लावलेला असतानापण तो डोळे मिणमिणते उघडे ठेवायचा. एकटेपणाची त्याच्याहून जास्त भीती वाटायची. आजूबाजूला चार लोकं पाहिजेत. ओळखीची नसतील तरी चालेल. नुसती असली पाहिजेत. आपण कसे दिसतो, आपण हुशार आहोत का सामान्य, आपलं बरं चाललय का नाही, आपण चांगले आहोत का वाईट, हे इतरांच्या प्रतीक्रीयेत्न आपल्याला सतत जाणवत असतं. आत्मविश्वासाची कमतरता असेल कदाचित पण ध्रुव ला ह्या प्रतिक्रिया सारख्या हव्या असायच्या. आणि त्या न विचारता मिळाव्या असं पण वाटायचं. ऑफिस मधे त्याची ही गरज पुर्ण व्हायची. घरात दुर्दैवानी तसं व्हायचं नाही. तिची आणि ह्याची लय कधी जुळलीच नाही. शेवटी शेवटी तर दोघं एकाच घरात दोन वेगळ्या खोल्यांमध्ये राहायला लागले. त्याची चरफड तशीच चालू राहिली. इतकं शोधूनही त्याच्या आयुष्याला दिशा लाभली नाही. आई वडील काय विचार करून नावं ठेवतात कोणास ठाऊक?

कधी कधी असं वाटतं त्यांनी आयुष्यभर जे शोधलं ते एका भिंती पलीकडे होतं. पण ती भिंत कधी त्याला पाडता आली नाही.

Labels:

Sunday, June 16, 2013

राही

ह्या मुलीला कसलीच घाई नव्हती. शाळेत जायची नाही. डबा खायची नाही. नोकरी शोधायची नाही. लग्न करायची नाही. ह्या धावपळीच्या जगात अश्या मुलीनी काय करावं? राहीनी शाळा केली कॉलेज केलं संसार केला. बटाट्याची भजी उत्तम केली. राहीनी बरंच काही केलं नाही. ती कधी चंद्रावर चालली नाही. चित्र काढली नाहीत. सिग्नल मोडले नाहीत (कारण तिला कसलीच घाई नव्हती !). झाडावर चढून चिंचा पाडल्या नाहीत. जे काही केलं ते सहज केल. जे काही करायचं राहिलं ते सहज राहिलं. इतक्या सगळ्या गोष्टी केल्या नाहीत तरी तिला कोणी आळशी म्हणल्याच आठवत नाही.

आई: अग पटकन अवर. शाळेला उशीर होईल !
बाबा: काही उपयोग नाही. ती तिच्याच वेगाने धावते.

राही कायम वेळेवर शाळेत पोचायची. ऑफिस मधे जायची तेव्हा वेळेवर जायची. पण 'सब चीज time to time होनी चाहिये' अशी पण नव्हती. तिला गजरानी कधीच जाग यायची नाही. गजर हा प्रकारच तिला आवडायचा नाही. झोप संपली की उठायला तिला आवडायचं. राही खूप जोरात पळायची. आणि गाडी तितकीच हाळू चालवायची. Solid athlete होती. पाऊसात पळायला तिला विशेष आवडायचं. का कोणास ठाऊक? एका लयीत पळायची. तासंतास. गणित ह्या विषयात तिला काहीच रस नव्हता. तरी CA झाली. काहीतरी व्हायचं तर हे होऊ असा विचार केला असेल कदाचित. तिच्या संपूर्ण व्यक्तिरेखेत जर कश्याचा पुर्ण अभाव असेल तर तो महात्वाकांषेचा होता. पण हेच राहीच्या सर्वात जवळच्या मैत्रिणी विषयी म्हणता येणार नाही. तिला fighter pilot बनायचं होतं. वेगाची नशा होती म्हणे तिला. महात्वाकांषेची तिच्यात काहीच कमतरता नव्हती. Air force मध्ये जाणं जमलं नाही पण बाईक मात्र पिसाटासारखी चालवायची. राही कधीच तिच्या मागे बसायची नाही. आणि ती कधी राहीच्या गाडीत बसायची नाही. कारण इतक्या हाळू चालणाऱ्या गाडीत ती वैतागून जायची. म्हणुन एकाच ठिकाणाहून निघून एकाच ठिकाणी जायचं असेल तरी दोघी दोन वाहनांवर जायच्या. आपापल्या वेगानं. मला हे कायम कुतूहल वाटायचं की इतक्या भिन्न स्वभाव आणि आवडीनिवडीच्या दोन व्यक्ती भेटल्यावर काय बोलत असतील? पण त्यांच्यात संवाद होत असावा. कारण राहीचे आई वडील गेल्या नंतर तिला खऱ्या अर्थानं ओळखणारं अस ही मैत्रीण सोडून दुसरं कोणीच उरलं नव्हतं.

राहीचं तिच्या नवऱ्याशी कधीच पटलं नाही. पण तरीही तिनी संसार केला. गणितात रस नसतानाही CA केलं तसंच बहुतेक. तो पण CA. बोलायला विषय बरेच असावेत. पण काम सोडून त्यांच्यात काहीच बोलणं होयचं नाही. सुरवातीच्या काही वर्षात तिनी खूप प्रयत्न केला. त्यांनी ही केला असेल. पण नंतर तिला लक्ष्यात आलं. त्यांना एकमेकांची फक्त सवय होऊ शकते. साथ नाही. तो मितभाषी. तरीही दुसर्यांनी त्याच्या मनातलं ओळखून त्याच्याशी वागण्याची अपेक्षा ठेवणारा. त्याची चूक नसेल कदाचित. लहानपणा पासून हव्या त्या गोष्टी न विचारता मिळाल्यामुळे सवय लागली असेल. आणि इतर सगळ्यांनी आपल्याला हवं तसं वागायला कोणाला नको असतं? तो चारचौघानसारखा होता. ही वेगळी होती. दोष कोणाला देणार? आपण स्वताला खूप महत्वाचे समजतो. कुठेतरी बाकी लोकांनी पण आपल्याला महत्व द्यावं असं वाटत असतं. As he says "Most people don't understand that God cast them as extras in this movie". पण आपल्याला हिरो हिरोईन इतकं महत्व हावं असतं. आणि इतर लोकांपेक्षा ते आपल्याच बायको आई वडील मुलांकडून उकळणं सोपं असतं. पण राहीला हे काहीच समजायचं नाही. तिनी कधी उगिच महत्व मागितलं नाही. आणि ते द्यायला ही तिला कधी जमलं नाही. ज्या ज्या लोकांनी तिच्याकडून अश्या अपेक्षा ठेवल्या त्या त्या लोकांशी तिचे संबंध सहजच कमी होत गेले. दुर्दैवानी तिचं लग्न देखील ह्याच गटात मोडतं.


खरं तर ती फक्त तिच्यासारख्या व्यक्ती बरोबरच संसार करू शकली असती. पण तिच्यासारखी लोकं असतात कुठे ह्या जगात ?

Labels:

Monday, June 10, 2013

Amour

I am frightened by old age. That is the one thing that really scares me. Not death, but old age.

Have you ever seen a old couple sitting in a park? Or crossing a road? What do you think of when you see them?

You think they are cute. Perhaps they are. So used to each other. There are no sudden movements, no unanticipated actions. A lifetime spent together guarantees that. But they were not always like this. Once, so many years ago, they had also met for the first time. They must have tentatively asked each others preferences. Guessed what he or she might like or not like. Carefully planned vacations which might have gone terribly wrong. Unexpected journeys, memories of which have lost all their details with time, but not their essence. They must have fought and argued with each other. Vicious misunderstanding which perhaps would have more than once threatened their very relationship. They must have dreamed of their perfect home and chosen a sofa, a dinner table for it together. They must have expected so much from each other and yet sometimes, when it was needed, let the other be alone to do his or her own thing. But these passionate things are past now. What remains is a routine to be followed from here on to the very end. Not by choice but by compulsion. Your body simply won't tolerate anything new. It is heart wrenching to see something that started with such fun, passion and love, end up so dry, mundane and dead.Amour is about a musician couple for whom old age is now a reality. Their once colorful and bright lives are now a series of slow movements and brief sentences. Illnesses set in and things go generally south. I was wondering what would it do to my self respect if i lose the ability to do the most mundane of everyday tasks? If i need to call for help every time i need to change my clothes? What if i know that this will never get better, old age is not reversible. Who would you ask for help everyday? Your partner is as old as you are. Your kids have their own lives their own worries to take care of. And what if you don't have any kids? Perhaps you would wish your parents were alive. I guess your mother is the only person you can ask for something without worrying how she would manage to do it. But she will be long long gone.

Somehow in India old age does not look that bad, yet. People still live with their parents. But things might change. You cannot demand freedom and independence (living separately) in your youth and then expect your kids to sacrifice their own plans and stay with you in your old age. That is just hypocrisy of the first degree. I increasingly feel our old age would not look like what we are seeing our parents go through right now. It would look more like what they show in Western movies. And it is a horrible terrible sight.
    
I have known people who get married and time their kids such that when they get old, their kids will be just the right age to come in handy. I don't know if their plan will work. I wish them the very best. For me, i have decided. The day i am not able to make it to the toilet and back on my own, i will register for sky-diving lessons. And if that doesn't work, i have a few other things on my mind.

Happy thirty third birthday to me.

PS: The other two movies that i saw on my long Mumbai - San Francisco flight were The Hobbit and Fargo. Both great movies, but not as rattling as this one. 

Labels: ,

Sunday, June 02, 2013

नांदी

नाही. नांदी ह्या नाटकाची सुरुवात नांदी नी होत नाही. Actually त्याचा शेवट 'पंचतुंड नररुंड' ह्या सुंदर नांदी नी होतो. नुकताच ह्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात झाला (दुसरीकडे कुठे होणार?!). त्या विषयी थोडसं.

नाटकाच्या सुरुवातीला एक पात्र असं म्हणुन जातं की आपल्याला आपला इतिहास समजून घेण्यात रस नसतो, मग भविष्यात काय करायचं ते कळत नाही आणि वर्तमानात नुसते गोल गोल फिरत बसतो. इंग्रजी मध्ये पण अशी म्हण आहे कि 'Those who cannot learn from history are doomed to repeat it'. माझा इतिहास हा विषय कायमच कच्चा होता. कदाचित ह्या नाटकात जितक्या प्रामाणिकतेने आणि रोचकतेने नाटकाचा इतिहास दाखवला आहे तसाच आमच्या शाळेतल्या मास्तरांनी शिकवलं असतं तर interest develop झाला हि असता. असो. जरी आपण इतिहास घडवणारे किव्हा तो पुढे मागे करणाऱ्यांपैकी नसलो तरी तो जाणून घेतल्यानी आपल्या सोबत आजूबाजूला बसलेल्या व असलेल्या लोकांविषयी काही interesting फंडे कळू शकतात कधी कधी. आणि तो इतिहास सांगायला स्वतः भरत मुनी आले तर? Add some sense of humor to the guy and you have a fun filled journey into the history of Marathi Theater. 

कालिदासलिखित अभिज्ञान शाकुन्तलम् मधील एका प्रसंगाने  ह्या प्रवासाला सुरवात होते. मी असा प्रकार पहिल्यांदाच बघत होतो म्हणुन जरा मजेशीरच वाटत होतं. अति आदर अथित्य. 'हे आर्यपुत्र' type dialogues. अतिरंजित हावभाव. आपण ह्या सगळ्याचं विडंबनच पाहिलेलं असतं. खरं कोण करतं असं आजकाल? पण ह्यातील कलाकारांनी ते खूपच sincerely केलं. म्हणुनच कदाचित प्रेक्षकांनी पण प्रवेश संपल्यावर टाळ्यांनी त्यांचं कौतुक केलं (व्यावसाईक नाटकाचे प्रेक्षक हे प्रायोगिक नाटकांना उगवणाऱ्या प्रेक्षकांपेक्षा कमी 'serious' असतात असं दिसतं. व्यावसाईक नाटकं वेळेवर सुरु होत नाहीत, लोकं मधे मधे येत रहातात, mobile वाजतात, 'आवाज आवाज' असं ओरडतात. पण हाच प्रेक्षक जास्त उत्स्फूर्त आणि न लाजता दाद देतो असेही जाणवते). ह्या नंतर संगीत सौभद्र मधील 'आजच्या youth ला आवडेल असा romantic' प्रवेश झाला. प्रसाद ओक ह्यांचा स्त्रीभूमिकेतील अभिनय आणि अजय पुरकर ह्याचं गायन फारच वरचढ झालं. जोरदार once more मिळाला आणि तो त्यांनी घेतला सुद्धा. कीचकवध, सखाराम बाईंडर, एकच प्याला, नटसम्राट, अश्रूंची झाली फुले, Barrister अश्या अनेक उत्तमोत्तम नाटकांमधील प्रवेश झाले.

ह्या सगळ्याला एकत्र गुंफ़णारे दोन धागे होते. एक म्हणजे कालिदासाच्या काळापासून आत्तापरेंत बदलत आलेले स्त्री पुरुष नातेसंबंध. कस अजूनही सगळा focus हा पुरुष पत्राचे काय होते ह्याला दिला जातो. फक्त नाटककार नाही तर प्रेक्षकांकडून सुद्धा. आणि दुसरा धागा म्हणजे पूर्वीच्या काळी असलेलं जाती, वर्ण, शारीरिक संबंध ह्या विषयी नाटकांमधून बोलण्याचं स्वातंत्र्य आता का कमी होत जातंय हा होता. ह्या नाटकातील भरत मुनी म्हणतात तस - ह्या गोष्टी प्रत्यक्ष होतात तेव्हा त्याचं कोणाला काही वाटत नाही पण त्याच नाटकात दाखवल्या तर बोंबाबोंब, दगडफेक, हाणामारी !

फालतुचे ban आणणं आपण बंद करावं आणि ** मधे दम असल्यासारखं वागावं ह्या सदिच्छेवर हे नाटक संपतं.  मला तरी खूप आवडलं. तुमचं तुम्ही ठरवा. नाट्यं भिन्नरूचैर्जनस्य !!

Labels: