Thursday, November 02, 2006

'न' जमलेली कविता

खुप डोक लढवल मी
पण कविता कधी जमलिच नाही !
बुद्धी नाही तो मनाचा प्रांत
हे अम्हाला समजलच नाही !

प्रेमात मोठ्ठा पोपट झाला
म्हंटल अता तरी कविता जमेल
प्रेम तर सोडा आमच साध
यमक सुद्धा कधी जुळल नाही !

थोडे पुढे निघुन गेले
काहींना मागे सोडल मी
अता खंत फक्त एव्हडिच्
'बरोबर' अस कोणी राहिलच नाही !

तसा सगळा वेळ वायाच गेला
पण काही क्षण विसरणार नाही
सापडले जरी शब्द युगानी
सूर अता तो मिळणे नाही !

खर म्हणजे मला कोणाची गरजच नस्ती
थांबल नाही कोणी, वाट मी कधी पाहिली नाही
खरच असत अस तर बंधन सगळिच सुटली अस्ती
पण मोहं हा बेडीचा, आमच्यानी काही तुटतच नाही !

जाउदेत emotions, आपण logic टाकू
जगण्याचा, अर्थ तरी शोधू... पण शेवटी,
का अलो इथे काय करायचय?
हे कोड कधी सुटतच नाही

खुप डोकं लढवलं मी
पण साली कविता कधी जमलिच नाही !

Labels: