फिरकी
मी आणि रव्या नेहमी प्रमाणे deccan च्या कट्ट्यावर (ह्या जागेचं आणि माझं काय वैर आहे कुणास ठाऊक) पान-बिडी करत उभे होतो. रव्या पचापच थुंकत होता आणि मी धूर काढत होतो. विषय पण नेहमीचाच काहीतरी, hot पोरी (आपल्याला का मिळत नाहीत), पुण्यातले वाढलेले जागांचे भाव (आपल्याला का परवडत नाहीत), वगेरे चालू होता. रात्री साधारण ११ ची वेळ होती, आणि दिवाळीत पडते तशी मस्त गुलाबी थंडी, ह्या वेळेला गणपतीतच पडली होती.
"घ्या, comedy आहे" आम्हाला 2 sec कळलच नाही, कारण आजोबा एकदम व्यवस्थित दिसत होते. म्हणजे त्यांच्या जुन्या पण स्वच्छ कपड्यान वरनं (गरीब असले तरी स्वाभिमानी होते, हे indicate करायचा गरीब प्रयत्न :P) ते असं विकत असतील असं वाटलं नाही. आम्ही ती magazines उगीच थोडी बघितल्यासारखी केली आणि नको म्हणून त्यांना परत दिली. शेजारीच एक पोरा-पोरींचा group मोरे च्या भुर्जी वर ताव मारत बसला होता. मग आजोबांनी तिथे जाऊन try मारला. त्यांनी पण आमच्या सारखच थोडं हसून बघितल्यासारखं केलं. इकडची गिराहीकं संपली हे लक्ष्यात आल्यावर त्यांची cycle ढकलत ते पुढे निघून गेले.
मग आम्ही अश्या situation मध्ये अपेक्षित असलेले काही विषय काढले.
मी: म्हातारपणात असं करावं लागणं कसलं वाईट आहे चायला. कोणावर अशी वेळ येऊ नये (स्वतावर आली तर काय, ह्या विचारानी फाटलेली).
रव्या: हो ना. आमच्या ओळखीत असं झालं एकांचं. तरुण मुलाला paralysis झाला, नोकरी गेली. मग काय...
मी: हो का? (अजून फाटली).
रव्या: तरी atleast ह्यांनी स्वाभिमान सोडला नाहीये. काहीतरी विकतायेत. भिक तरी मागत नाहीयेत.
मी: exactly! that is good. माझं principle आहे, भिक द्यायची नाही. ते encourage होतात आणि मग त्यांचच नुकसान होतं (वगेरे वगेरे full shinning ..)
बिडी संपली आणि आम्ही आपापल्या दिशेने कटलो. पण काहीतरी अस्वस्थ, चुकल्यासारखं वाटत होतं (नशीब!). थोडं पुढे अजून एका टपरी पाशी ते आजोबा परत दिसले. बास म्हंटलं आता खूप झालं. गाडी तिथेच park केली आणि त्या टपरी पाशी गेलो. मी त्यांच्या कडे जाणार एव्हड्यात समोरनं रव्या येताना दिसला.
मी: च्यायला हा कुठून आला! लाज निघणार आता आपली. (अश्या लोकन बद्दल वाईट वाटणे, sensitive असणे, etc. ह्या हास्यास्पद qualities असतात. especially दारू party मध्ये ह्या मुळे बरीच लाज निघू शकते)
रव्या: अरे तू काय करतोय इथे?
मी: (काहीतरी थाप मारावी असं वाटलं, पण anyways त्याला कळणार होतं) अरे त्या punter कडनं एखादं पुस्तक घेणार होतो.
रव्या: मी पण :)
मग दोघांनी एक-एक 'फिरकी - कौटुंबिक विनोदी मासिक' घेतलं आणि तिथून सुटलो. पण विषय सुटला नाही. आपण अजून काही करायला हवं होतं का? अजुन ४ अंक का नाही घेतले? त्यांच्याशी जरा बोलायला हवं होतं का? घरी आल्या-आल्या ashlya ला हे सगळं सांगितलं. ती पण मग बराच वेळ अस्वस्थ होती.
मी: (थोड्या वेळानी) आलीस का परत normal ला?
ती: आपण परत normal ला येतो, ह्याचाच राग येतो कधीकधी.
HBO वर कुठला तरी क्ष horror movie बघण्यात मी कधीच दंग झालो होतो ..

Labels: musings