कथा
[I know this is a wrong place for a short story. Bloggers (readers and writers) don't have an attention span of more than 2 paragraphs :P But i have no where else to put it up. So here goes..]
आज पहिल्यांदा माझ्या हातून एक खूनी सुटला. बरं झालं.
1 वर्षा पूर्वी ऐन दिवाळीत ती पहिल्यांदा माझ्याकडे आली. माझं office थोडं आड वस्तीत असल्यामुळे लोक, especially बायका, इथे येताना जरा घाबरतच येतात. गर्दीच्या वेळा टाळतात. सण तर नाहीच नाही. म्हणून तिला वर येताना पाहिल्यापासून माझ्या डोक्यात चक्रं सुरू झाली. जिन्यावर चपलांचा आवाज, steady. दारावर आल्यानंतर आत जायचं का वळून परत जायचं हे ठरवायला लागणारा क्षणाचा delay, missing. भीती, awkwardness, चिंता, missing. हिचं पहिलं वाक्य काय असेल?
त्या गोंधळ आणि फटाक्यांच्या आवाजातही मला तिचे शब्द स्पष्ट ऐकू आले. "माझ्या नवर्याचा खून झालाय. पोलीस missing person's report च्या पुढे जाऊ शकले नाहीत. तुम्ही मदत करू शकाल?"
आमचे हे बाहेर कुठे शेण खात फिरतात जरा शोधाल का? हयापेक्षा हे फारच interesting होतं. मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं. 1 तास तिनी तपशीलवार माहिती दिली. मी फार interfere केलं नाही. बोलणारा काय बोलतोय हे ऐकताना तो ते का बोलतोय, हे बोलण्या मागे त्याचा काय motive आहे, ह्याचा सुगावा घेणं ही धंद्यामुळे पडलेली सवय. त्या घटनेमुळे तिचं अख्खं आयुष्य बदललं होतं. दुःख अगदी स्वाभाविक होतं. पण त्या बरोबर कुठेतरी, हे सगळं का झालं? कसं झालं? ह्याची curiosity पण जाणवत होती. interesting. शेवटी, सगळी case समजावून घेतल्यानंतर, ती परत जायला निघताना फक्त एक प्रश्न विचारला. "ह्या गोष्टीला आता दोन वर्षं झाली. तुम्ही त्यातून बाहेर आलायत, routine मध्ये settle झालायत असं वाटतं. हे सगळं परत सुरू करावं असं का वाटतंय?"
case घेताना मी ती सोडवायला किती वेळ लागेल त्याचा अंदाज बांधतो. मी ह्या case ला तीन महिने दिले होते. Obviously माझा अंदाज साफ चुकला.
तो
माझ्या बायकोच्या म्हणण्याप्रमाणे investigation चा पहिला महिना मी नेहमी वाया घालवतो. पण मला असं वाटतं की आपण जसे असतो, त्याचा आणि आपल्या बाबतीत काय घटना घडतात, ह्याच्यात काहीतरी संबंध असतो. त्याला कोणी शत्रू नव्हते. in fact त्याला कोणी मित्रही नव्हते. फार काही आवडी-निवडी ही नव्हत्या. बहुतेक सगळ्या photos मध्ये थोड्याफार फरकानी तेच expression दिसत होतं. हा हसणार तेवढ्यात कोणीतरी photo काढून टाकल्यासारखं. दिसायला काही वाईट नव्हता, in fact चांगलाच होता.
त्या दिवशी तो नेहमीसारखा गाडीनी office ला गेला. पण office मध्ये पोचला नाही. तो, त्याची गाडी, cell phone, त्यानी त्या दिवशी घातलेले कपडे, काहीच सापडलं नाही. त्याला शेवटचं त्यांच्या building मधल्या watchman नी गाडीत बसून जाताना पहिलं होतं. त्याच्या घरापासून office चा रस्ता ४० कि.मी. चा असेल. त्यातला १० कि.मी. चा पल्ला थोडा सुनसान आणि निर्मनुष्य होता. त्याच्या बायकोचा असा अंदाज होता की ह्याच वाटेवर त्या दिवशी त्याच्यावर हल्ला झाला.
पोलिसांच्या फाइल मधून फारशी माहिती मिळाली नाही. त्याची बायको, watchman, office मधल्या दोन लोकांची statements होती. बाकी सगळी fields blank ठेवली होती. त्याच्या ओळखीच्या लोकांकडून जितकी माहिती मिळू शकेल तितकी मी मिळवली होती. पण सगळ्यांकडून थोड्याफार फरकानी तेच ऐकायला मिळालं होतं. normal, average, कमी बोलणारा, ह्या पलीकडे कोणाचं काहीच मत नव्हतं त्याच्याबद्दल. ही गोष्ट मला खटकत होती. वरवर आपण सगळेच normal असतो, पण थोडं खोलात शिरलं की लगेच प्रत्येकामधला वेगळेपणा बाहेर येतो. ह्याच्या बाबतीत असं होत नव्हतं. either हा खरंच अपवाद होता किंवा अतिशय शिताफीनं त्यानी त्याचं खरं रूप लपवलं होतं.
शोध
त्याचं routine समजावून घेण्यासाठी मी आठ दिवस रोज त्याच्या रोजच्या रस्त्यांनी सगळ्या वेळांना जाऊन आलो. प्रत्येक hotel, दुकानात जाऊन चौकशी केली. कोणालाच तो आठवत नव्हता. not surprising. शेवटी कंटाळून बिडी मारायला एका टपरीवर थांबलो. धूर काढणं संपवून पैसे देत होतो. "cigarette सोडली म्हणायची तुमच्या दोस्तानी." तो पानवाला माझ्या हातातल्या photo कडे बघून म्हणत होता. Hardwork pays, one way or another. पूर्वी तो रोज office मधून येताना ह्याच टपरीवर थांबायचा. मी बोललेल्यांपैकी कोणालाच हे माहिती नव्हतं की तो smoking करायचा. आपण गोष्टी लपवतो जवळच्यांपासून, परक्यांसमोर कोण चिंता करतो? त्या पानवाल्यामुळे एक फार महत्वाची गोष्ट कळली, he knew how to keep a secret.
ह्या case ला relevant अशी अजून एक गोष्ट त्याच्याकडून कळली. पूर्णपणे गायब होण्याआधी (त्याला कोणीतरी मारलं आहे हे assumption मी अजून केलं नव्हतं) काही वर्षांपूर्वी त्यानी रोज इथे येणं बंद केलं होतं. क्वचितच यायचा. त्याच्या एका विशिष्ट सवयीमुळे त्या पानवाल्याच्या तो लक्षात राहिला होता. कुठली cigarette देऊ विचारल्यावर त्याचं उत्तर "तुम्हाला हवी ती." असं असायचं. smokers आपापल्या brand विषयी खूपच serious असतात. कुठली बिडी ओढतोय ह्याची आसक्ती नसणारे फुकाडे मी फार कमी पाहिलेत.
मुळात cigarette सोडणंच सोपं नसतं आणि काही कारणाशिवाय तर ते शक्यच नसतं. त्याच्या आयुष्यात असं काय घडलं असेल की ज्याच्यामुळे त्यानी इतकी खोलवर रुजलेली सवय बदलली? तो ती बदलू शकला.
दुसर्याच दिवशी मी त्याच्या बायको कडून त्याची गेल्या पाच वर्षांची सगळी financial documents घेऊन आलो. आजकालच्या जगात आपल्या credit card statement इतका आयुष्याचा accurate log दुसरा कुठलाच नसतो. तिलाही माझी ही पद्धत आवडली. त्या दिवशी काय घडलं असेल हे speculate करण्याऐवजी मी ते जे काही घडलं असेल ते का घडलं असेल त्याचा शोध घेत होतो. आमच्या बिरादरी चे आद्य गुरु, गुरुवर्य Holmes म्हणतात तसं - When you have eliminated the impossible, whatever remains, however improbable, must be the truth.
मी त्यातल्या सगळ्या entires नीट तपासल्या. त्याचं एक table बनवलं, derivative घेतलं, distribution plot केलं, co-relation function generate केलं. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. suspicious असं काहीच आढळलं नाही. माझं gut-feeling असं होतं की मी बरोबर track वर आहे. पण कुठल्याच नवीन leads मिळत नव्हत्या. 6 महिने असेच गेले. मधे अनेक फालतू cases येऊन गेल्या. एका होतकरू नवर्याच्या background check चं काम आलं. त्या मुलाची दहावी पासून B.Com पर्यंतची सगळी certificates खोटी होती. वय पण चुकीचं दाखवलं होतं. मी हा report वधूपित्याला दिला. दोन महिन्यांनी ते लग्न झालं. म्हणे ते आधीच शब्द देऊन बसले होते, आता मोडलं तर लोक काय म्हणतील? ठीक आहे.
एकदा MSEB चं bill भरायला रांगेत उभा होतो. तेव्हा अचानक tube पेटली. ताबडतोब office वर गेलो. सगळ्या files परत काढल्या. आत्तापर्यंत मी कुठे कुठे खर्च केलाय आणि किती केलाय हे पहात होतो. पण सर्वात मोठी information "Date" च्या column मध्ये होती. तारखेप्रमाणे सगळ्या entries परत plot केल्या तेव्हा एक perfect pattern समोर आला. एका point पर्यंतच्या सगळ्या entires अस्ताव्यस्त होत्या. कधी due-date च्या नंतर बिलं भरली होती, कधी खूप आधी भरली होती. Financial planning कडे पूर्ण दुर्लक्ष होतं. २००७ च्या मे महिन्या पासून चित्र एकदम वेगळंच होतं. प्रत्येक बिल, प्रत्येक खर्च perfectly aligned होता. त्याच सुमारास त्यानी cigarette पण सोडली असणार. त्या मे महिन्यात त्याच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी जबरदस्त घडलं असणार.
त्या मे महिन्याच्या प्रत्येक दिवशी काय काय झालं हे मी तिला जितक्या details मध्ये लिहिता येईल तितकं लिहून ठेवायला सांगितलं. त्या उन्हाळ्यात त्याला de-hyderation झालं म्हणून दोन दिवस hospital मध्ये admit केलं होतं. दुसरं काहीच unusual असं आढळलं नाही. पण माझ्या ह्या theory मुळे तिच्याही डोक्यात चक्रं सुरू झाली. एकदा असंच बोलताना सांगत होती "शेवटची दोन वर्षं खूप छान गेली. कारण त्याला कशाचा रागच येत नसे. खूप उत्साहात असायचा. मलाही सारखा म्हणायचा, तू नवीन काहीतरी शिकत का नाहीस? गाणं, पेटी, एखादा खेळ? पण मला कशातच interest नसायचा. आत्ता विचार केल्यावर असं वाटतं की तो काहीतरी बदलला होता. पण बदल चांगल्यासाठी असेल तर आपण प्रश्न विचारत नाही." कदाचित तिनी विचारायला हवं होतं.
Hospital चे reports मिळवणं जरा tricky होतं. Doctor-patient confidentiality मुळे ते कोणालाच देत नाहीत. पोलिसांनी offically investigation बंद केलं असल्यामुळे search warrent मिळालं नसतं. ह्याला work-around शोधायला लागणार होता. Mean while एका hunch वर मी तिला paper मध्ये एक जाहिरात द्यायला सांगितली.
"लाल रंगाची सँट्रो त्वरित विकत घेणे आहे. registration व इतर कागदपत्र नसतील तरी चालेल. कि. २ लाख. रोख व्यवहार."
काही दिवसांनी मी आजारी पडल्यामुळे hospital मधे admit झालो. Doctor नी over-night observation साठी ठेऊन घेतलं. Naturally, मी गोळ्याच तश्या घेतल्या होत्या. दर दोन तासांनी nurse च्या rounds होत्या. रात्री एकच्या round नंतर, I.V. काढून मी खोलीबाहेर सटकलो. Records room चं कुलूप अगदीच गरीब होतं (गोदरेज). पुढच्या अर्ध्या तासात त्याची सगळी records शोधून copies बनवल्या. त्या वर्षीचं Visitor's Register पण शोधलं. त्याला भेटायला आलेल्यांपैकी पहिल्या entry चं अक्षर त्याच्या बायकोशी जुळत होतं. पण पुढच्या पानावर मला अजून एक entry सापडली. तिथे नुसतं 'स्वामी' असं लिहिलं होतं. सही नव्हती. strange, त्याच्या बायकोच्या म्हणण्याप्रमाणे ती सोडून त्याला कोणीच भेटायला आलं नव्हतं. मग हा स्वामी कोण? त्याच्या समोरच्या खोलीत तेव्हा कोण patient होता हे शोधून त्यांचाही पत्ता लिहून घेतला. कारण CCTV recordings तीन वर्षं कोणीच ठेवत नाही.
त्या patient एक सत्तर वर्षांच्या आजी होत्या. कसलंतरी infection झाल्यामुळे चार दिवस admit होत्या. त्यांच्या घरच्यांना समोर कोण होतं काहीच आठवत नव्हतं. मे महिन्याची सुट्टी चालू असल्यामुळे त्यांची ७ वर्षांची नात पूर्ण वेळ त्यांच्या बरोबर होती. तिला विचारल्यावर काल घडलं असल्यासारखं म्हणाली. "orange dress घातलेले काका आले होते. त्यांनी मला खेळायला एक beed दिलं." मी translate केलं - रुद्राक्ष, भगवी कफनी, स्वामी. हे स्वामी character कोण होतं? आणि का आलं होतं?
जाहिरात दिल्यानंतर ३ दिवसांनी तिचा प्रचंड excited फोन आला. "त्याची गाडी सापडली!". ती गाडी विकायला आलेल्या पोराला जरा दमात घेतल्यावर सगळं भडाभडा बोलला. माझा अंदाज खरा ठरला. त्याला ती गाडी शहराबाहेर एका छोट्या train station वर सापडली होती. पूर्ण मोकळी, दार उघडं आणि किल्ली ignition मध्ये अशा अवस्थेत ती त्याला सापडली होती. Number plates पण नव्हत्या. गाडी सारखी गोष्ट destroy करणं सोपं नाही. जर ती अर्धवट destroyed राहिली तर लगेच संशय येतो आणि पोलिसांना कळू शकतं. त्यापेक्षा जर ती चोरीला गेली तर चोर ही व्यवस्थित काळजी घेतो की ती कोणालाच सापडणार नाही. ज्यानी कोणी ती गाडी तिथे सोडली त्यानी नक्कीच त्याचा homework केला होता.
ते station पाहिल्यानंतर एक आशेचा किरण दिसू लागला. station च्या parking ला लागूनच एक party lawn होतं. तो गायब झाला त्या दिवशी ह्या lawn वर कुठलं function चालू असेल तर त्यांच्या video recording मध्ये कदाचित.. त्या दिवशी तिथे किरपे - रसाणे शुभविवाह चालू होता. किरप्यांशी (वधूपक्ष) दोस्ती करून त्या लग्नाचे सगळे videos/photos मिळवले. पण तो cameraman फारच professional निघाला. आलेली लोकं सोडून त्यानी काहीच record केलं नव्हतं.
पुढचा १ महिना आम्ही त्या स्वामीविषयी माहिती मिळवायचा प्रयत्न केला. त्या मुलीकडून sketch बनवून घेतलं. police records, hotel registers, धर्मशाळा सगळं पालथं घातलं. त्यानी दिलेलं रुद्राक्ष त्या मुलीकडून मिळवलं. त्याला किती मुखं आहेत, कुठल्या प्रदेशातल्या झाडाचं आहे, वर polish आहे का, इत्यादि कीस पाडला. त्यावरून एवढं कळलं की उत्तर-पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी किंवा मानसरोवर प्रदेशात उगवणार्या एका दुर्मिळ झाडापासून हे आलेलं असू शकतं. एवढी मला खात्री होती की तो माणूस ह्या शहरात राहणारा नव्हता. पण इतक्या लाखोंच्या शहरात ५ वर्षांपूर्वी आलेला एक माणूस कसा सापडणार?
जेव्हा नवीन evidence सापडत नसतो तेव्हा जुनी माहिती उकरत बसतो. आपण नक्कीच काहीतरी miss केलं असणार. असंच आम्ही ती किरप्यांची tape बघत बसलो होतो. बघता बघता तिनी एकदम video pause केला. screen वरच्या एका माणसाच्या हातात handicam सारखं काहीतरी दिसत होतं. किरप्यांकडे चौकशी केली, तो नवर्यामुलाचा college मधला मित्र निघाला. त्याला हुडकून काढलं, ती tape मिळवली. त्यानी पूर्ण लग्नात दोन चांगल्या दिसणार्या मुलींवर focus केलं होतं. recording च्या शेवटी त्या मुली ह्याला bye-bye करत होत्या. picture out of focus होतं पण screen च्या उजव्या कोपर्यात एक लाल santro दिसत होती. मी tape pause केली आणि frame-by-frame पुढे नेली. हळूहळू त्या गाडीचं दार उघडलं, भगवी वस्त्र घातलेली एक व्यक्ति बाहेर पडली, आणि दार तसंच उघडं टाकून station च्या आत निघून गेली.
वाराणसी
त्या दिवशी तिथे एक passenger train (अप), एक मालगाडी (डाउन) आणि एक मालगाडी (अप) अश्या ३ train थांबल्या होत्या. ती सँट्रो station वर आल्याची वेळ, तिथून गेलेल्या trains चे मार्ग आणि stops, रुद्राक्ष आणि भगवी कफनी, अशा अतिशय weak logic वर मी वाराणसीला आलो होतो. म्हणून अपेक्षा फारच कमी होत्या. तरी महिना दोन महीने रहाण्याच्या तयारीनी आलो होतो. पण इथे आल्यावर एक फारच अनपेक्षित प्रकार घडला होता. मी त्याला शोधायच्या आधी त्यानीच मला गाठलं होतं. rather, त्याच्या निरोपानी. जसं काही तो कोणाचीतरी वाटच बघत होता. ह्या report सोबत तो कागद जोडलेला आहे. मी त्याचे अनेक financial reports पाहिले होते. हे अक्षर थोडं बदललं असलं तरी निःसंदेह त्याचंच होतं.
"मी तुझा दोषी आहे. आणि तरीही तुझे माझ्यावर असंख्य उपकार आहेत. आज परत एकदा तुझ्यामुळे मला माझी पुढची वाट सापडली आहे."
ज्या कागदावर हे लिहिलं होतं तो cheap quality चा होता. शाईच्या वासावरनं, ती किती blot झालीये आणि किती रंगं बदललाय ह्या वरून हे उघड होतं की गेल्या एक-दोन दिवसातच हे लिहिलं होतं. कदाचित आजच. पण आता मला सगळा प्रकार लक्षात आला होता.
"देवा, आपणहून गेलेल्या माणसानी आपणहूनच परत येण्यात अर्थ आहे. नाही का?" कागद माझ्या हातात देताना तो चिलीम ओढणारा फकीर म्हणाला होता. त्यातला शहाणपणा मला समजला. मी हे investigation इथेच थांबवतोय.
मी
ती मला शोधून काढणार ह्याबद्दल मला पूर्ण खात्री होती. आज माझा चेहरा घेऊन कोणीतरी मला इथे शोधतंय हे कळल्यावर एकदम तिची खूप आठवण आली. तीन वर्षांपूर्वी तिला, मला, सोडून मी असा निघून गेल्यावर तिची काय अवस्था झाली असेल, ह्याची कल्पना करून अचानक भीती वाटली. आपण का केलं असं? आणि का करू शकलो?
ती hospital ची भीती होती का मरणाची भीती का अजून काहीतरी मला माहीत नाही. पण त्या दिवशी त्या खाटेवर पडल्या पडल्या मला काय करायचंय ते लख्ख दिसलं होतं. खरं सांगायचं तर ते पूर्वीपासूनच माहीत होतं. पण त्या दिवशी ते मिळवण्यासाठी लागणारा निश्चय आणि आत्मविश्वास गवसला होता. आता फक्त एकच प्रश्न उरला होता. तिचं काय? दोन वर्षं हा प्रश्न सोडवण्यात घालवली देवा. पण तो सुटलाच नाही. दर वेळी सांगायचा प्रयत्न करायचो आणि थांबायचो. तिला हे कळणं जरा अवघडच होतं, कोणालाच कसं कळणार? मला लक्षात आलं होतं की हे धागे मी तोडले, तरी ती नाही तोडू शकणार. शेवटी सगळ्या खाणाखुणा मिटवून निघून आलो.
आज परत एकदा खूप मोकळं, मुक्त वाटतंय. तीन वर्षांपूर्वी मी इथे आलो तेव्हासारखं. मला कोणीच ओळखत नव्हतं. हजारो भगव्या वस्त्रांमधे मी एक. जे शोधायला निघालो ते मिळत होतं. पण मग इथेही ओळखी झाल्या पाळखी झाल्या. नावं झाली गावं झाली. सवयी झाल्या. मग काय फरक राहिला माझ्या आधीच्या शहरात आणि ह्याच्यात? किती दिवस ठरवत होतो इथून पुढे जायचं. पण सुखाची सवय मोडणं सोपं नसतं देवा. आज तिनी परत मला मदत केली. निर्णय घ्यायलाच लावला. इथे थांबलो असतो तर तिला सामोरं जावं लागलं असतं. ज्याच्यासाठी तिला, सगळंच सोडलं, ते अजून सापडलं नव्हतं. वाट स्वच्छ दिसत होती. पण त्याच्यावर चाललं तर पाहिजे! मनापासून तिची माफीही मागायची होती, शत-शत आभार मानायचे होते. घाईघाईतच निरोप लिहिला आणि जसा ह्या ठिकाणी आलो होतो तसाच, फक्त अंगावरच्या वस्त्रानिशी, हे शहर सोडून परत एकदा वाट नेईल तिथे निघालो..
[Thanks ashlya for correcting the शुद्धलेखन (did i get that word right? :P)]
Labels: musings