ती गेली तेव्हा
आई जाऊन खूप महिने झाले. मी अजून रडलोच नाहीये.
काही कवितांचे अर्थ नुस्ते वाचून समजत नाहीत.
लहानपणी मला आई-बाबांच्या खोलीत झोपायला खूप आवडायचं. ते झोपल्या-झोपल्या रात्री उशिरा परेंत गप्पा मारत बसायचे. डोक्यावरनं पांघरूण घेऊन मी त्यांच्या गप्पा ऐकत बसायचो. आई दिवसभरातल्या गम्ती-जम्ती सांगत असायची आणि बाबा हं, फारच, अगदी, अशी उत्तरं देत असायचे. दोगही आपापल्या जगात असायचे. तरीही त्यांच्या मध्ये एक पक्कं understanding असायचं. अनेक वर्ष सगळ्या सुख-दुख्खांमध्ये एकमेकांची सोबत केल्यामुले आलेलं understanding.
हे सगळं आत्ता विचार करताना लक्ष्यात येतंय. तेव्हा फक्तं त्याचे आवाज ऐकताना जशी झोप लागायची, तशी बाकी कुठेच लागायची नाही. तिथे झोपताना जितकं safe आणि बिनधास्त वाटायचा, तितकं अजून कुठेच वाटलं नाही.
परवा बाबांना बरं वाटत नव्हतं म्हणून त्यांनी माला त्यांच्या खोलीत झोपायला बोलावलं. मी नेहमी सारखाच गादी घेऊन नेहमीच्याच जागेवर झोपलो. पण ते पूर्वीचं, नेहमीचं, जगातल्या सगळ्या चिंता विसरवून साखर झोप देणारं feeling मात्र आलं नाही. बाबांशी गप्पा मारायला आई नव्हती.
I lost the safest place in my world when i lost my mother.
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
काही कवितांचे अर्थ नुस्ते वाचून समजत नाहीत.
Labels: musings